Sunday 30 November 2014

“आरसा”



आज सकाळी मी आरसा पाहिला,
जरा पण हसला नाही तो बेचारा.
इतकयात तोच मला म्हणाला,
काय रे मिञा! आज हसला नाहिस?

अरेच्चा! हो की!
मीच हसत नव्हतो!
पण त्या वेङ्याला काय सांगू?
आपोआप हसायला थोडी येतं!

माझे हसणे हे, कुणाचे हसणे आहे!
माझे रुसणे, हे पण कुणाचे तरी रुसणे आहे!
मी पण कुणाचा तरी आरसा आहे,
हे मी त्या वेड्याला कसे सांगू?

आरसा बनून, तुला पाहत हसतो,
तुझ्या छोट्याशा मिशकिलीला टिपत असतो.
जणु हेच सांगत असतो तुला,
खुप गोड दिसतेस गं माझी बाला!

तु खुप हसावे
आणि तुझ्यात माझे प्रतिबिंब दिसावे
तु खुप नटावे,
आणि आरश्यावाणि माझ्या डोळ्यात पहावे.

तुला खुशी मिळावी,
तुझी स्तुती करावी,
तुला निरंतर पहावे,
म्हणूनच् मला वाटते, मी तूझा आरसा बनावे!

-    गाँडफ्री

My expressions are always your reflections! They were just never mine.


-    Godfrey 

Sunday 21 February 2010

चला रे गड्या, तोडून टाक

चला रे गड्या, तोडून टाक,
नाही तर काही, फोडून टाक .

विकासाची आहे कोणाला फिकर,
जरी महगाईने वाकली आहे, सगळ्यांची कमर.
आपली चर्चा व्हायलाच हवी,
चल गड्या काही तरी फोडू या,
नाहीतर काही तरी तोडूया.

शिक्षणाचा दर्जा तर घसरलाच,
लोड शेडिंगने अभ्यासाचा केला वाटोळ्च.
पण आपल्याला ह्याचे काय,
खेळाडूंचे किवा बोलीवूड वाल्यांचे आपण ओडुया पाय.

लाखो भारतीय परदेशी असतात,
काही तिथे शिकतात आणि काही पोटासाठी तिकडेच टिकतात.
पण त्यांचा विचार कोण करणार,
आपण तर मतांसाठी लोकांना दिशा भूल करणार.

नवे काही करायचा आम्हाला विसरच पडला,
पण जुन्या रचनांची नावे बदलण्यात मी सतत झटला.
मारामारी दंगलिला सामन्य माणूस विसरलाय,
चला भडकुया त्यांना, शांत राहण्यात काय आनंद दडलाय.

काय मग गड्यांनो, येतायना आमच्या बरोबर,
तोडूया, फोडूया, भडकुया, विकुया
अस्सल भारताची जी शान आहे, विविधता,
त्या विविधतेलाच चवाटयावर आणू या.

Thursday 30 April 2009

" माझी चिमुकली "

" माझी चिमुकली "

वेदनांच्या सरी होत्या सुरु, पण मनात होती एकच आस.
माझ्या चिमुकलीशी खेळावे, सदा रहावे तिच्या आसपास.

वेदनांची झळ मी शोषली, वेदनांशीच दोस्ती मी केली.
तुला पहायला, ए चिमुकली, मी दिवस राञ एक केली.

आज वेदनांची तिव्रता क्षणोक्षणी वाढतच होती,
तिला मिठीत घ्यायची इच्छा सुध्दा, क्षणोक्षणी वाढतच होती.

डॅाक्टरांची चाहूल लागली, अन् मला उमगले, आता ती वेळ आली,
वेदनांचे थैमान चालूच होते, मी तर भान हरपुन किंचाळत होते.

सहनशिलता ऊत्तर देत होती, कळ मला सहन होत नव्हती.
पण आजपर्यंतची, सर्वांत कठिण हि परिक्षा मला ऊत्तीर्ण व्हायची होती.

एखादे वादळ अचानक थांबावे , तसा तो क्षण होता.
माझ्या ह्रदयाची स्पंदने चुकाली होती, माझ्या चिमुकलीची चाहूल मला लागली होती.

माझा जीव, माझ्या काळजाचा तुकडा माझ्या छातीशी होती.
ती धयाधया रडत होती, माझ्याही डोळ्यात आनंद अश्रूंची भरती होती.

नारीचे कर्तव्य बजावल्याचा अभिमान, कि चिमुकलीला स्पर्श करायचे सुख,
मनात माझ्या अशा विविध भावनांची गर्दी होती.

माझ्या चिमुकलीला मी क्षणभरही दुर होऊ दिले नाही,
कारण तिच्यावर जीव ओतायची एकही संधी मला गमवायची नव्हती.

मी तर आता ह्या जगाची नव्हते,
नाती, सोबती सगळे मला अनोळखी भासले.
माझी चिमुकली फक्त माझी, मी फक्त माझ्या चिमुकलीची,
आता ऐवढेच माझे विश्व उरले.


आपला गॅाडफ्री.

Sunday 27 July 2008

"चाहत"

क्यो मन अब मेरा गुमसूम रहता है?
ना जाने क्यो अब ये तनहा महसूस करता है?
मेरी तलाश कब रुके, कब मिले दिलको राहत?
कया कहे तुजसे ऐ जालिम, कितनी हमे है तुजसे चाहत।



क्यो अब मेरी ये आँखे तुजको धुंडती है?
तू रहे सामने, तो इन्हे जन्नत दिख जाती है।
धूंडे हर जगह, कही तो महसूस हो तेरी आहट।
क्या कहे तुजसे ऐ जानम, कितनी हमे है तुजसे चाहत।



क्यो धडकने को वैसे ये दिल धडकता है?
लेकिन सासों पर मेरे फिर भी सिर्फ तेराही पहरा है।
खुदा की है तु प्यारी सी बनावट।
कया कहे तुजसे ऐ सनम कितनी हमे है तुजसे चाहत।



क्यों मेरी ये जिंदगी अब मेरी नही है?
क्यों यादों मे मेरी तू बसी रहती है?
अब अपने दिल मे बस जाने, की दे मुझे तु इजाजत।
मुझे करनी है तुजसे, सिर्फ तुजसे बेइंतहा मोहब्बत।


" आपका गाँडफ्री "

Thursday 24 July 2008

तू का गेलीस ?

तू का गेलीस ?

तू का गेलीस जिवनातून माझ्या,

आता काय माझे उरणार,

जाऊ नको दुर अशी,

सांग मला, तू कधी मला मिळणार ?

चेहरा माझा पाहू नको,

कि चेहरा मला दाखवूही नको,

जिवनातून तर गेली आहेस,

आता स्वपनातून तरी जाऊ नकोस.

चूक होती माझी, माझीच चूक होती,

तू काहीच केलं नाहीस,

मी पडलो अपार प्रेमात तूझ्या,

तरी तू काहीच केलं नाहीस.

आता जीव द्यायची तयारी आहे,

आता मरण्याची सुद्धा घाई आहे,

जा, वाट पाहणार नाही मी तुझी,

असं सांगून करत आहे, फसवणूक स्वःताची.

जीव तर तू घेतलास,

आता ह्या शरीराचं काय करू,

तूच शुचव मला,

कि मी आता जगू का मरू?

माहित असेल तुला रोमिओ,

माहित असेल तुला देवदास,

पण तुला कधीच नाही कळणार,

का गाँडफ्री राहिला उदास ?

आपला गाँडफ्री.

Sunday 22 June 2008

"माझी आई"

मिञांनो,

माझ्या अगोदरच्या कवितेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

“ माझी आई “

तूझ्याविषयी मी कधीच काही लिहीलं नाही,की,

तुझ्याविषयी मी कधी लिहूच शकलो नाही.

बहूतेक तेवढी क्षमताच् नव्हती माझ्यात,की,

महिमा मोठा आहे, “आई” ह्या शब्दात.

पण आज मी काही लिहत आहे,

कारण आज तूझा वाढदिवस आहे.

आजचा दिवस फारच विशेष आहे,

पण सगळ्या गोष्टी तशाच आहेत.

सतत कष्ट करणारी तू,आजही कष्ट करतेस.

सतत झटणारी तू,आजही झटत असतेस.

आमच्या पोटापाण्यासाठी,

कधी कमी घास तू गिळलास.

आमच्या इच्छापूर्तीसाठी,

स्वताच्या इच्छांचा खून केलास.

एवढ्या चांगल्या वागणूकीची,

आम्ही परतफेड कशी केली.

तक्रारींवर तक्रारी करून,

अश्रू अन् दुःख तेवढी दिली.

मी काय पूण्य कलं होतं,

की, तू माझी आई आहेस.

तू तरी काय पाप केलंस,

की, तू माझी आई आहेस.

चुका आता सुधारायच्या आहेत,

परिस्थिती आता बदलायची आहे.

देवाचं काय नक्की माहित नाही.

पण तुला त्याचे स्थान द्यायचे आहे.

“आई” हा शब्द जितका लहान आहे,

महिमा त्याचा तेवढाच महान आहे.

तुझ्या गुणांपैकी, एकही गुण जरी माझ्यात आला,

तर मी सांगेन, माझा जन्म सार्थ झाला.

लहान मूल पहिल्यांदा जेव्हा बोलतं,तेव्हा तो शब्द “आई” असतो.

पण मी जेव्हा अखेरचा बोलेन,तेव्हा तो शब्द “आईच” असेन.



आपला गाँडफ्री.

Saturday 14 June 2008

" निराशा "

सुस्वागतम मिञांनो,
सादर आहे तुमच्या समोर माझ्या कवीतांचा संग्रह.
निराशा हि प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावत असते. आठवी इयत्तेत असताना मी सुध्दा हयाच निराशेचा बळी ठरलो आणि कसं माझ्या भावनांनी मला छळले ते........

" निराशा "

आज झालो आहे मी निराश,
कशाची तरी आहे मला तलाश.
मन झाले आहे फार निरस,
जीवनरुपी जमिनीचा निघून गेला कस.
कधी होईल ह्या दुःखांचा अंत,
कधी संपेल माझ्या मनातील खंत.
उन्हाळ्यतच् थंड पडलो,
दुःखाच्या चम्रव्यूहात असाच सडलो.
दुःखाची हि झळ शोषून,
शरीररूपी पाकळ्या गेल्या मिटून.
शेवटची आशाही धूळीस मिळाली,
माझ्या आयुष्याची तर रांगोळीच झाली.
संकटांचे वादळ आले,
सारे काही उडून गेले.
राञंदिवस रडते हे पराभूत ह्रदय्,
कुठून झाला ह्या संकटांचा उदय.
सुरु आहे संकटांचा मारा,
पण आनंदी आहे समाज सारा.
अंतकरणात क्रुतघ्नेची भावना दाटली,
अन् मलाच माझी लाज वाटली.
दुःख, निरशा तर सगळीकडेच असते,
अन् निराशेतूनच आशेची वाट शोधायची असते.

हि कविता आवडली तर क्रुपया तुमचा प्रतिसाद कळवा.
आपला विनम्र,
गाँडफ्री मच्याडो.