Sunday 22 June 2008

"माझी आई"

मिञांनो,

माझ्या अगोदरच्या कवितेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

“ माझी आई “

तूझ्याविषयी मी कधीच काही लिहीलं नाही,की,

तुझ्याविषयी मी कधी लिहूच शकलो नाही.

बहूतेक तेवढी क्षमताच् नव्हती माझ्यात,की,

महिमा मोठा आहे, “आई” ह्या शब्दात.

पण आज मी काही लिहत आहे,

कारण आज तूझा वाढदिवस आहे.

आजचा दिवस फारच विशेष आहे,

पण सगळ्या गोष्टी तशाच आहेत.

सतत कष्ट करणारी तू,आजही कष्ट करतेस.

सतत झटणारी तू,आजही झटत असतेस.

आमच्या पोटापाण्यासाठी,

कधी कमी घास तू गिळलास.

आमच्या इच्छापूर्तीसाठी,

स्वताच्या इच्छांचा खून केलास.

एवढ्या चांगल्या वागणूकीची,

आम्ही परतफेड कशी केली.

तक्रारींवर तक्रारी करून,

अश्रू अन् दुःख तेवढी दिली.

मी काय पूण्य कलं होतं,

की, तू माझी आई आहेस.

तू तरी काय पाप केलंस,

की, तू माझी आई आहेस.

चुका आता सुधारायच्या आहेत,

परिस्थिती आता बदलायची आहे.

देवाचं काय नक्की माहित नाही.

पण तुला त्याचे स्थान द्यायचे आहे.

“आई” हा शब्द जितका लहान आहे,

महिमा त्याचा तेवढाच महान आहे.

तुझ्या गुणांपैकी, एकही गुण जरी माझ्यात आला,

तर मी सांगेन, माझा जन्म सार्थ झाला.

लहान मूल पहिल्यांदा जेव्हा बोलतं,तेव्हा तो शब्द “आई” असतो.

पण मी जेव्हा अखेरचा बोलेन,तेव्हा तो शब्द “आईच” असेन.



आपला गाँडफ्री.

2 comments:

Unknown said...

Hey Buddy,

its really amzing. Never knew taht you are such a good poet.

regards,
Nazneen

Unknown said...

Godfrey, I never knew you had this talent. The poem expresses ur thoughts clearly without making use of any high-level marathi literature. Job well -done. Appreciate ur work...Can I send this poem to my mother...need ur approval for copy-rights.