Sunday 22 June 2008

"माझी आई"

मिञांनो,

माझ्या अगोदरच्या कवितेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

“ माझी आई “

तूझ्याविषयी मी कधीच काही लिहीलं नाही,की,

तुझ्याविषयी मी कधी लिहूच शकलो नाही.

बहूतेक तेवढी क्षमताच् नव्हती माझ्यात,की,

महिमा मोठा आहे, “आई” ह्या शब्दात.

पण आज मी काही लिहत आहे,

कारण आज तूझा वाढदिवस आहे.

आजचा दिवस फारच विशेष आहे,

पण सगळ्या गोष्टी तशाच आहेत.

सतत कष्ट करणारी तू,आजही कष्ट करतेस.

सतत झटणारी तू,आजही झटत असतेस.

आमच्या पोटापाण्यासाठी,

कधी कमी घास तू गिळलास.

आमच्या इच्छापूर्तीसाठी,

स्वताच्या इच्छांचा खून केलास.

एवढ्या चांगल्या वागणूकीची,

आम्ही परतफेड कशी केली.

तक्रारींवर तक्रारी करून,

अश्रू अन् दुःख तेवढी दिली.

मी काय पूण्य कलं होतं,

की, तू माझी आई आहेस.

तू तरी काय पाप केलंस,

की, तू माझी आई आहेस.

चुका आता सुधारायच्या आहेत,

परिस्थिती आता बदलायची आहे.

देवाचं काय नक्की माहित नाही.

पण तुला त्याचे स्थान द्यायचे आहे.

“आई” हा शब्द जितका लहान आहे,

महिमा त्याचा तेवढाच महान आहे.

तुझ्या गुणांपैकी, एकही गुण जरी माझ्यात आला,

तर मी सांगेन, माझा जन्म सार्थ झाला.

लहान मूल पहिल्यांदा जेव्हा बोलतं,तेव्हा तो शब्द “आई” असतो.

पण मी जेव्हा अखेरचा बोलेन,तेव्हा तो शब्द “आईच” असेन.



आपला गाँडफ्री.

Saturday 14 June 2008

" निराशा "

सुस्वागतम मिञांनो,
सादर आहे तुमच्या समोर माझ्या कवीतांचा संग्रह.
निराशा हि प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावत असते. आठवी इयत्तेत असताना मी सुध्दा हयाच निराशेचा बळी ठरलो आणि कसं माझ्या भावनांनी मला छळले ते........

" निराशा "

आज झालो आहे मी निराश,
कशाची तरी आहे मला तलाश.
मन झाले आहे फार निरस,
जीवनरुपी जमिनीचा निघून गेला कस.
कधी होईल ह्या दुःखांचा अंत,
कधी संपेल माझ्या मनातील खंत.
उन्हाळ्यतच् थंड पडलो,
दुःखाच्या चम्रव्यूहात असाच सडलो.
दुःखाची हि झळ शोषून,
शरीररूपी पाकळ्या गेल्या मिटून.
शेवटची आशाही धूळीस मिळाली,
माझ्या आयुष्याची तर रांगोळीच झाली.
संकटांचे वादळ आले,
सारे काही उडून गेले.
राञंदिवस रडते हे पराभूत ह्रदय्,
कुठून झाला ह्या संकटांचा उदय.
सुरु आहे संकटांचा मारा,
पण आनंदी आहे समाज सारा.
अंतकरणात क्रुतघ्नेची भावना दाटली,
अन् मलाच माझी लाज वाटली.
दुःख, निरशा तर सगळीकडेच असते,
अन् निराशेतूनच आशेची वाट शोधायची असते.

हि कविता आवडली तर क्रुपया तुमचा प्रतिसाद कळवा.
आपला विनम्र,
गाँडफ्री मच्याडो.