Saturday 14 June 2008

" निराशा "

सुस्वागतम मिञांनो,
सादर आहे तुमच्या समोर माझ्या कवीतांचा संग्रह.
निराशा हि प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावत असते. आठवी इयत्तेत असताना मी सुध्दा हयाच निराशेचा बळी ठरलो आणि कसं माझ्या भावनांनी मला छळले ते........

" निराशा "

आज झालो आहे मी निराश,
कशाची तरी आहे मला तलाश.
मन झाले आहे फार निरस,
जीवनरुपी जमिनीचा निघून गेला कस.
कधी होईल ह्या दुःखांचा अंत,
कधी संपेल माझ्या मनातील खंत.
उन्हाळ्यतच् थंड पडलो,
दुःखाच्या चम्रव्यूहात असाच सडलो.
दुःखाची हि झळ शोषून,
शरीररूपी पाकळ्या गेल्या मिटून.
शेवटची आशाही धूळीस मिळाली,
माझ्या आयुष्याची तर रांगोळीच झाली.
संकटांचे वादळ आले,
सारे काही उडून गेले.
राञंदिवस रडते हे पराभूत ह्रदय्,
कुठून झाला ह्या संकटांचा उदय.
सुरु आहे संकटांचा मारा,
पण आनंदी आहे समाज सारा.
अंतकरणात क्रुतघ्नेची भावना दाटली,
अन् मलाच माझी लाज वाटली.
दुःख, निरशा तर सगळीकडेच असते,
अन् निराशेतूनच आशेची वाट शोधायची असते.

हि कविता आवडली तर क्रुपया तुमचा प्रतिसाद कळवा.
आपला विनम्र,
गाँडफ्री मच्याडो.

2 comments:

HAREKRISHNAJI said...

आशा निराशेचा खेळ हा चालायचाच. पण आपण म्हणाता तसं

निराशेतूनच आशेची वाट शोधायची असते.

Unknown said...

I like the last 3 lines. keep up the good work.
अजुन कविता वाचायला आवडतील. so waiting for the next blog.