Thursday 30 April 2009

" माझी चिमुकली "

" माझी चिमुकली "

वेदनांच्या सरी होत्या सुरु, पण मनात होती एकच आस.
माझ्या चिमुकलीशी खेळावे, सदा रहावे तिच्या आसपास.

वेदनांची झळ मी शोषली, वेदनांशीच दोस्ती मी केली.
तुला पहायला, ए चिमुकली, मी दिवस राञ एक केली.

आज वेदनांची तिव्रता क्षणोक्षणी वाढतच होती,
तिला मिठीत घ्यायची इच्छा सुध्दा, क्षणोक्षणी वाढतच होती.

डॅाक्टरांची चाहूल लागली, अन् मला उमगले, आता ती वेळ आली,
वेदनांचे थैमान चालूच होते, मी तर भान हरपुन किंचाळत होते.

सहनशिलता ऊत्तर देत होती, कळ मला सहन होत नव्हती.
पण आजपर्यंतची, सर्वांत कठिण हि परिक्षा मला ऊत्तीर्ण व्हायची होती.

एखादे वादळ अचानक थांबावे , तसा तो क्षण होता.
माझ्या ह्रदयाची स्पंदने चुकाली होती, माझ्या चिमुकलीची चाहूल मला लागली होती.

माझा जीव, माझ्या काळजाचा तुकडा माझ्या छातीशी होती.
ती धयाधया रडत होती, माझ्याही डोळ्यात आनंद अश्रूंची भरती होती.

नारीचे कर्तव्य बजावल्याचा अभिमान, कि चिमुकलीला स्पर्श करायचे सुख,
मनात माझ्या अशा विविध भावनांची गर्दी होती.

माझ्या चिमुकलीला मी क्षणभरही दुर होऊ दिले नाही,
कारण तिच्यावर जीव ओतायची एकही संधी मला गमवायची नव्हती.

मी तर आता ह्या जगाची नव्हते,
नाती, सोबती सगळे मला अनोळखी भासले.
माझी चिमुकली फक्त माझी, मी फक्त माझ्या चिमुकलीची,
आता ऐवढेच माझे विश्व उरले.


आपला गॅाडफ्री.