Thursday 24 July 2008

तू का गेलीस ?

तू का गेलीस ?

तू का गेलीस जिवनातून माझ्या,

आता काय माझे उरणार,

जाऊ नको दुर अशी,

सांग मला, तू कधी मला मिळणार ?

चेहरा माझा पाहू नको,

कि चेहरा मला दाखवूही नको,

जिवनातून तर गेली आहेस,

आता स्वपनातून तरी जाऊ नकोस.

चूक होती माझी, माझीच चूक होती,

तू काहीच केलं नाहीस,

मी पडलो अपार प्रेमात तूझ्या,

तरी तू काहीच केलं नाहीस.

आता जीव द्यायची तयारी आहे,

आता मरण्याची सुद्धा घाई आहे,

जा, वाट पाहणार नाही मी तुझी,

असं सांगून करत आहे, फसवणूक स्वःताची.

जीव तर तू घेतलास,

आता ह्या शरीराचं काय करू,

तूच शुचव मला,

कि मी आता जगू का मरू?

माहित असेल तुला रोमिओ,

माहित असेल तुला देवदास,

पण तुला कधीच नाही कळणार,

का गाँडफ्री राहिला उदास ?

आपला गाँडफ्री.

3 comments:

Unknown said...

जीवन हे एक कोडेच आहे, कोणी एक व्यक्ती आपल्या जीवनात येते आणि न सांगताच निघून जाते... आणि आपण आयुषभार तिची वाट बघतो...एक मृगजलच आहे...खुप छान कविता लिहिलेस...

Manish Katoch said...

hey gods, i remember this was the first ever poem you wrote ( and shared with us..) it was lovely then and it is lovely still!

so very beautiful!!

Jatin Arora said...

Khup chan mitra!!!

Asa watta ki tujhya jeevnat kadhi kon gaila ahes!!!

Pan gahbru nakos!!!
Me tila smbhadoon thevla aahes

:-)